रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 फेब्रुवारी 2019 (09:44 IST)

लातूर मनपाचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत अनेक मागण्य थकीत वेतन

मराठवाडयातील लातूर येथे वेळोवेळी निवेदने देऊन ही महानगरपालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी गंभीर नसल्याचा आरोप रमाकांत पिडगे यांनी केला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपासह ठिय्या आंदोलन सुरू केले.आंदोलनात मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले असून, कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे थकित वेतन तात्काळ अदा करावे, निवृत्ती वेतन एक तारखेला देण्यात यावे, तसेच कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करावी अशा मागण्यांसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला. मात्र प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.आंदोलनात सर्वच प्रवर्गामधील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मागण्या मान्य नाही झाल्यास हे काम बंद आंदोलन चालूच राहिल असे पिडगे यांनी सांगितले. या आंदोलनास आपला या पाठिंबा आहे आणि मुख्यमंत्री आणि पालकमंत्री हा विषय कायमचा प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असे उपमहापौर देविदास काळे यांनी सांगितले. या आधीच्या सत्ताधार्‍यांनी ही वेळ आणली आहे. अभिमन्यू पवार, पालकमंत्री संभाजी पाटील या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत असेही काळे म्हणाले.