शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (09:13 IST)

सेहवाग येणार राजकारणात भाजपकडून तिकीटाची शक्यता

आपल्या देशाचा उत्तम क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग क्रिकेटनंतर आता राजकीय मैदानावर आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल असे चित्र आहे. तो भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा हरियाणातील रोहतक मतदारसंघातून सेहवागला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी २०१९ रविवारी पार पडलेल्या भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत सहभागी एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, रोहतक मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते दिपेंद्र सिंह हुड्डा यांचा पराभव करण्यासाठी विरेंद्र सेहवागच्या नावाची जोरदार चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी मात्र सेहवागला उमेदवारी देण्याचं वृत्त फेटाळून लावले आहे. तर सेहवाग ने अद्याप भाजपा पक्षात प्रवेशही केला नसल्याच स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ नेत्याकडे विरेंद्र सेहवागला ही ऑफर देण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र त्याने नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ नेत्याने इंग्रजी वृतपत्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, सेहवाग बाबत भाजपा पक्षाने निर्णय घेतला असून, आता यासाठी होकार द्यायचा की नाही हे संपूर्ण सेहवागवर अवलंबून असणार आहे. नेत्याकडे विरेंद्र सेहवागशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तो नेता दिल्ली आणि एनसीआरमधील राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे क्रिकेटमधील विरू आता राजकारणात कश्या प्रकारे आपला दबदबा बसवतो की राजकारणापासून अलिप्त राहतो हे येणारा वेळच सांगणार आहे.