बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जानेवारी 2019 (16:50 IST)

म्हणून मनसेने सर्व तिकीटे घेतली

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी घडलेल्या मानपानाच्या नाट्याचे पडसाद अजूनही सुरु आहेत. 
 
अभिजित पानसे यांच्या कुटुंबियांना यावेळी बसायला जागा न मिळाल्याने आज ठाण्यातील मनसेच्या संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यातील वंदना सिनेमाच्या बाहेर लावलेल्या चित्रपटाच्या फलकावरील खासदार संजय राऊत यांचे नाव खोडले आहे. याशिवाय या अपमानाचा बदल घेण्यासाठी या सिनेमागृहातील सर्व तिकीट मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी विकत घेतली आहेत. आता  शुक्रवारी साडेबाराला होणाऱ्या या शो साठी अभिजित पानसे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याची माहिती महेश कदम यांनी दिली आहे.