शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Updated : गुरूवार, 24 जानेवारी 2019 (15:20 IST)

पुण्याच्या 12 वर्षाच्या हाजिकने समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी लावला शोध

पुण्याच्या अवघ्या १२ वर्षाच्या हाजिक काजी मुलाने समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण कमी होण्यासाठी शोध लावला आहे. त्याने एका जहाजाचे मॉडेल तयार केले आहे. या जहाजाचा उपयोग जल प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सागरी जीवन वाचवण्यासाठी होऊ शकतो. दरम्यान त्याने लावलेल्या संशोधनाचे जगभरात कौतुक केले जात आहे. 
 
हाजिक काजीने बनवलेले जहाजाचे नाव इर्विस असे ठेवण्यात आले आहे. हे जहाज समुद्रातील कचरा खेचून घेईल. त्यानंतर त्यातील पाणी, समुद्र जीवन आणि कचऱ्याचे वर्गीकरण करेल. त्यानंतर पाणी आणि समुद्र जीवन पुन्हा समुद्रात सोडेल. कचऱ्यामध्ये सापडणाऱ्या प्लॅस्टिकचे ५ भागांमध्ये विभागणी केली जाईल, अशी माहीती हाजिकने दिली आहे. हाजिकने आपली संकल्पना टेडएक्स आणि टेड8 या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडली आहे.