मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट प्रभावाबद्दल माहिती नसेल. आपल्यातील बरेच लोक PUBG खेळत असतील. आपले मित्र देखील PUBG खेळत असतील परंतु तुम्हाला माहिती नसेल की PUBG खेळण्याची ही सवय आपल्याला हॉस्पिटल पोहोचवू शकते. 
 
PUBG च्या व्यसनानेच एक फिटनेस ट्रेनर रुग्णालयात पोहोचला आहे. 10 दिवस PUBG खेळण्याने आणि मिशन पूर्ण केल्यानंतर, त्याची मानसिक स्थिती खराब झाली आहे. चला संपूर्ण केस जाणून घेऊ या.
 
एका न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार जम्मू-काश्मीरमध्ये फिटनेस ट्रेनरची स्थिती खराब झाली आहे. अहवालानुसार ते 10 दिवसांपासून PUBG खेळत होता. खेळाचा मिशन पूर्ण केल्यानंतर त्याने आपले मानसिक संतुलन गमावले आहे. मिशन पूर्ण केल्यानंतर त्याने विचित्र गोष्टी करायला सुरवात केली आणि स्वतःला हानी पोहोचवू लागला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा केस समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल यांच्याकडे या खेळावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांच्या मते फिटनेस ट्रेनरचे आरोग्य सुधारत आहे आणि त्याने लोकांना ओळखण्यास सुरवात देखील केली आहे. परंतू मेंदूवर गेमचे आफ्टर इफेक्ट्सच प्रभाव अजून देखील आहे.