मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 16 जानेवारी 2019 (09:15 IST)

राज यांचे मोदी, भक्त आणि शहा यांच्यावर फटकारे पहा व्यंग चित्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी  आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची मकरसंक्रांतीची संधी साधत व्यंगचित्रातून जोरदार टीका केली आहे. . राज ठाकरेंच्या मते, आरक्षण तेही १० टक्के ही एक नवी थाप आहे असे त्यांनी व्यंगचित्रात दर्शवले आहे.
 
राज ठाकरे नेहमीच व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदी सरकारवर जोरदार  टीका करतात. मकर संक्रांती निमीत्त त्यांनी एक जोरदार व्यंगचित्र काढले आहे. व्यंगचित्रामध्ये मोदी पंतग उडवत असून, त्यांच्या पतंगावर नव्या थापा, १० टक्के आरक्षण असे लिहले आहे, सोबतच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मोदींची फिरकी पकडली आहे. मोदींना 'पतंग' उडवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात मोदींच्या 'कापलेल्या पतंगांचा' ढिगारा म्हणजेच फसलेल्या निर्णयांचा खच दाखवला आहे. या व्यंगचित्रात मोदी यांच्यासोबत अमित शाह, मोदी भक्त, आणि काही मीडिया यांची उपस्थिती दर्शवली आहे. त्यांनी हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.