सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:22 IST)

'या' पुस्तकातील ८० टक्के दावे खोटे : एम के नारायणन

80 claims in book on
‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ मधील ८० टक्के दावे खोटे असल्याचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन यांनी म्हटले आहे. या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक संजय बारू यांच्यावरही नारायणन यांनी टीका केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले बारू यांची क्षमताच नव्हती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पैसे कमावण्यासाठी हे पुस्तक लिहिले होते, असा आरोप मनमोहन सिंग यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या नारायणन यांनी केला.
 
पुस्तकातील ८० टक्के दावे खोटे आहेत. सरकारमध्ये त्यांचे तेवढे मोठे पद नव्हते तसेच त्यांना महत्वही नव्हते. माध्यम सल्लागार म्हणून त्यांचे काम ही चांगले नव्हते. यूपीएचे सरकार पुन्हा येईल, असे त्यांना वाटले नाही. त्यामुळेच ते २००८ मध्ये गेले, असे ते म्हणाले.