खोटी बोलणारी मुले मोठेपणी बनतात 'स्मार्ट'?
सगळेच पालक आपल्या मुलांना नेहमी खरे बोलावे, असे शिकवतात. मात्र हल्लीच झालेल्या एका अध्ययनातून भलताच निष्कर्ष समोर आला आहे. जी मुले बालपणी खोटे बोलतात, त्यांची आकलनक्षमता भविष्यात अधिक चांगली होते, असा दावा या अध्ययनात करण्यात आला आहे.
सरळ शब्दांत सांगायचे तर अशी मुले मोठेपणा हुशार व तल्लख बनतात. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या कॅग ली यांनी सांगितले की, पालक, शिक्षक व समाजाकडून अजूनही मुले बालपणी खोटे बोलत असतील, त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. मुलांच्या खोटारडेपणाचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, असे त्यांना वाटते. बालपणी खोटे बोलणे व मोठेपणीचा खोटारडेपणा यात मोठे अंतर आहे, असेही या अध्ययनात स्पष्ट केले आहे. खरेतर मुले अतिशय छोट्या वयातच खोटे बोलतात, त्याची आकलनक्षमता भविष्यात आणखी सुधारते, असे या अध्ययनाचे निष्कर्ष सांगतात. शास्त्रज्ञांनी चीनमधील प्राथमिक शाळेतील 42 मुलांवर अध्ययन केले. त्यांनी लपाछपीच्या खेळात सुरुवातीस खोटे बोलण्याच्या क्षमतेचे कोणतेही प्रदर्शन केले नाही. नंतर त्यांची दोन गटात विभागणी केली. त्यात मुले मुलांची संख्या समान होती. या खेळात त्यांनी खेळणी मोठ्यांची नजर चुकवून लपवायची होती. मूल मोठ्यांसोबत खोटे बोलले वा त्यांना फसविण्यात यशस्वी ठरले तर त्याला खेळणी मिळत असे. खेळ जिंकण्यासाठी मुले वेगवेगळी शक्कल लढवून खोटे बोलत असल्याचे त्यात दिसून आले