शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (10:11 IST)

भुजबळ यांच्या कडून ठाकरे चे कौतुक प्रती बाळासाहेब होणे नाही

राज्यातील मोठे नेते आणि माजी शिवसेनेचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे हा सिनेमा पाहिला. सिनेमा पाहून भुजबळ भारावून गेले होते. शिवसेना कधीही संपणार नाही आणि प्रती बाळासाहेब कधीही होणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेना एका विचार आहे त्यामुळे तो संपणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. जर आज बाळासाहेब असते तर अमित शहा यांना पटक देगे असे बोलता आले नसते असेही भुजबळ म्हणाले आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. शिवसेना भक्कमपणे उभी राहीली असल्याचे नमुद केली. माणसे बदलली अनेक जण शिवसेना संपेल असे म्हणत होते परंतु केवळ मीच शिवसेना सपंणार नाही असे म्हंटल्याचे स्मरण करून देत भुजबळ यांनी शिवसेना तळागाळात असल्याने ती संपणे शक्य नसल्याचे सांगितले. आताही शिवसेनेने चांगल्या पध्दतीने काम करीत आहे असे सांगितले आहे. या चित्रपटात नारायण राणे किंवा स्वत: भुजबळ यांच्या विषयीचा उल्लेख नसल्याचे विचारल्यानंतर चित्रपट ठाकरेंवर आहे. तो भुजबळ किंवा राणेंवर नाही. बाळासाहेबांचे जीवन चरित्रच इतके मोठे आहे की, त्यात एक चित्रपट नाही तर असे सात- आठ चित्रपट काढावे लागतील असेही भुजबळ म्हणाले आहेत.