शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुख्यमंत्री शिवसेनेचा युतीची बोलणी यावर थांबली

लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे त्यात अनेक वर्ष सोबत असणारे शिवसेना-भाजपामध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरुच आहे. शिवसेना आणि भाजपाचे नेते एकमेकांना इशारे देत असून, मात्र  पडद्याआड युतीची देखील जोरदार बोलणी  सुरू आहे.  या चर्चांना अजूनतरी अधिकृत असे  मूर्तस्वरुप आलेलं नाही.

एका बाजूला शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेनं आता एक नवी महत्वाची अट वजा  मागणी केली आहे. शिवसेनेच्या नव्या मागणीमुळे नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएत असणारे पक्ष त्यांच्या राज्यात भक्कम स्थितीत असून, केंद्रात तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

एनडीएनं 2019 मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यात शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. दुसरीकडे एनडीएतील पक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात अतिशय चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला जर केंद्रात मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांसाठी सोडावं,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या मागणीमुळे युतीच्या बोलणीत नवं वळण येऊ शकतं. युती व्हावी म्हणून भाजपा आग्रही असून निवडणुकीचा निकाल २०१४ सारखा लागणार नाही त्यामुळे इतर पक्षांना महत्व येणार हे भाजपाला कळून चुकले आहे त्यामुळे युतीची बोलणी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा 25, तर शिवसेना 23 जागा लढवणार असून विधानसभा निवडणुकीत भाजपा 145, तर शिवसेना 143 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.