गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राष्ट्रवादीचा गड बारामती मध्ये कमळ फुलणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM devendra fadnavis
येत्या २०१९ लोकसभा निवडणुकीत आम्ही  ४८ जागा लढवणार असून,  मागच्यावेळी ४२ जागा आम्ही  जिंकल्या,  यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामती येथील असणार आहे. आम्ही  बारामतीमध्ये कमळ फुलवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले.
 
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या  निवडणुकीत थोड्या मताने बारामतीमधील जागा गेली होती,  मात्र या  निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार असून,  शिरुर, मावळ मधील जागा देखील  भाजप जिंकणार असा विश्‍वास त्यांनी बोलतांना  व्यक्त केला आहे.आपल्या देशात काही जण मुलाचे पुनर्वसन करत आहेत असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि नाव न घेता सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे.