शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अण्णा हजारे यांच्यात चर्चा

राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण आंदोलनाचा सातवा दिवस असून, अण्णांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: राळेगणसिद्धीत भेट घेतली आहे. मुख्यमंत्री यांच्या सोबत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय संरक्षण राज्यमंंत्री सुरेश भामरे,   राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीत उपस्थित असून त्यांच्यात चर्चा सुरु आहे. 

अण्णा  उपोषण करत असलेल्या यादवबाबा मंदिरातील खोलीत या सर्वांनी चर्चा केली आहे.  आण्णांच्या खोलीत बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीला चार मंत्री, चार सचिव आणि अण्णांसह तीन प्रतिनिधी उपस्थित होते. या महत्वाच्या बैठकी नंतर अण्णा उपोषण मागे घेतात का हे लवकरच समोर येणार आहे. लोकपाल  नियुक्ती, लोकायुक्त कायदा, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषण करत आहे. तर सातव्या दिवशी गावकऱ्यांनी आज चूलबंद आंदोलन केलं.