मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (09:12 IST)

भाजपा सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे पुण्याची ओळख पुणे तिथे 'पाणी' उणे अशी झाली आहे!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेला पश्चिम महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातील #वडगाव_बुद्रुक येथे झालेल्या परिवर्तन सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. 
 
पुण्याची आतापर्यंत एक वेगळी ओळख होती. आधी म्हटलं जायचं पुणे तिथे काय उणे पण आज या भाजप सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की आज म्हटलं जातंय पुणे तिथे 'पाणी' उणे असे मत राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांनी वडगाव बुद्रुक येथील परिवर्तन सभेत व्यक्त केले. आज पुण्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आम्ही सत्तेत असताना पुण्यात कधी पाण्याची कमतरता जाणवू दिली नाही पण आज भाजपला आठ आठ आमदार दिले, पण तरी देखील भाजपाने शहराला पाणी दिले नाही. निवडणूक आली म्हणून विविध कार्यक्रम राबविले जात आहे. सीएम चषक आयोजित करत आहे लोका़चे मन वळवण्याचा नवा फंडा या सरकारने आणला आहे. सरकार नियोजन करत नाही. मुख्यमंत्र्यांना फक्त नागपूरबाबत; जास्त प्रेम आहे. असा टोला देखील आ. अजितदादांनी मारला. 
 
संपूर्ण पुणे खोदुन ठेवले आहे. शहरात वाहतूक कोंडी आहे. मनपाचे काम होत नाही, पुण्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पुण्यात बलात्कारासारख्या घटना रोज घडत आहेत. पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत. गुंडांना तडीपार केले जात नाही, पोलिसांचा वचक राहिला नाही. पण सरकार लक्ष घालत नाही. पालकमंत्री गिरीष बापटसुद्धा लक्ष घालत नाही, अशी टीकादेखील आ. अजितदादा पवार यांनी केली. 
 
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर कठोर टीका केली.
 
खडकवासल्यात कचऱ्याचे नियोजन नीट होत नाही, या सरकारला सोशल मीडियाची फार हौस आहे त्यामुळे सर्व सोशल मीडियावर मी सरकारला धारेवर धरते. इथला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक नगरसेवक कार्यक्षम आहे. जर कार्यक्षम नगरसेवकाचा पराभव होत असेल तर मला वाटतं की खरच ईव्हीएममध्ये घोटाळा आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.