बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (09:28 IST)

चिमुकलीचा पराक्रम अवघ्या दोन तासांत हरिश्चंद्रगड सर केला

औरंगाबादमधील चार वर्षाच्या मन्नत मिन्हास चिमुकलीने २७ जानेवारीला अवघ्या दोन तासांत हरिश्चंद्रगड सर केला आहे. मन्नतने गड सर करताना चिप्स आणि जेम्सच्या गोळ्या सारखे हलकेफुलके खाद्य सोबत ठेवलं होते, अशी अशी माहिती एव्हरेस्टवीर मनिषा वाघमारे यांनी दिली.
 
मन्नत मिन्हासचा जन्म २२सप्टेबर २०१४ रोजी रोजी झाला. तिची आई वुडरिच शाळेत क्रिडा प्रशिक्षक आहे. तर वडिल अवतार मिन्हस लघूउद्योजक आहेत. मिन्हास कुटुंब मूळचे हरियाणातील आहे. याआधी डिसेंबर २०१८ मध्ये कलावंतीण दुर्गही मन्नतने आईसोबत सर केला होता. गेल्या काही महिन्यापासून मन्नत आणि आई माधवी विद्यापीठ परिसरातील गोगा टेकडीवर ट्रेंकिगसाठी जात होती.