मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (11:14 IST)

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल ११ तासांचा महाब्लॉक

आज रात्री २ फेब्रूअरी रोजी १० वाजल्यापासून ते उद्या म्हणजेच रविवारी 3 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल ११ तासांचा महाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉकदरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाही. लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी 2 फेब्रुवारीला मेगाब्लॉक रेल्वे घेणार आहे. दोन क्रेनच्या मदतीने ४० टन वजनी उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात येतील. या कामासाठी 2 फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही. अंधेरी, विरार, वसई, भाईंदर, बोरिवलीतून सुटणाऱ्या लोकल प्रभादेवी स्थानकापर्यंत चालवण्यात येतील असे रेल्वने स्पष्ट केले आहे. या मार्गावरील अनेक मेल, एक्स्प्रेसमधील वेळेत बदल केले आहेत. लोअर परळ स्थानकाजवळील डिलाईल पूल गंजल्याचे स्पष्ट झाल्याने पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल बंद होता.