शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (09:06 IST)

एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारकडून एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामुळे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १.४६ रुपयांनी कमी होणार आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ३० रुपयांनी घटेल. गुरुवारी मध्यरात्रीपासून हे दर लागू झाले आहेत. त्यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत ४९३.५३ रूपये मोजावे लागतील. मुंबईसह देशातील अन्य शहरांमध्येही ही दरकपात लागू होईल. 
 
गेल्या तीन महिन्यांपासून एलपीजी सिलेंडरच्या दरात सातत्याने कपात होत आहे. यापूर्वी १ डिसेंबरला अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ५.९१ रुपयांनी कमी झाली होती. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत १२०.५० रुपयांनी खाली आली होती.