शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (13:23 IST)

ब्राम्हण बिझनेस नेटवर्क ग्लोबल बी.बी.एन.जी. ची राष्ट्रीय परिषद २ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे

'‘समर्थ ब्राम्हण, समृद्ध ब्राम्हण, संपन्न ब्राम्हण’ या ब्रीद वाक्यावर कार्य करणा-या ब्राम्हण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (बी.बी.एन.जी.) ची राष्ट्रीय परिषद ‘घे भरारी’ येत्या २ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे होत असून सुमारे १००० हून अधिक उद्योजक यात सहभागी होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली.  वर्ष २०१२ मध्ये नाशिक येथून सुरु झालेल्या बीबीएनजी चे जाळे राज्यात तसेच विदेशातही पसरले असून हजारो उद्योजक नेटवर्किंग द्वारे येथे जोडले गेले आहेत.
 
ठाणे (प.) मधील आर. नेस्ट बँक्वेट येथे आयोजित या एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता होणार असून याप्रसंगी भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदिप पेशकार, पितांबरीचे रविंद्र प्रभू देसाई, अतुल कुलकर्णी व विवेक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर दिवसभर चालणा-या विविध सत्रांमध्ये अविनाश धर्माधिकारी हे व्यवसाय हीच देशसेवा, चंद्रशेखर टिळक हे बदलती बाजारपेठ व व्यावसायिक, मृगांतक परांजपे हे जागतिक बाजारपेठेतील संधी, संजय ढवळीकर हे एनपीएचा चक्रव्यूह कसा भेदाल व शिवानंद अप्पाराज हे हॉस्पिटल मधील व्यवसाय संधी यावर उपस्थित उद्योजकांना मार्गदशन करतील. त्यानंतर महिला उद्योजकांचे चर्चासत्र होईल यामध्ये उद्योजिका वैशाली भट, नेहा कांदळगावकर व शरयू देशमुख या सहभागी होतील. दरम्यान बी २ बी सत्राचेही आयोजन करण्यात आले असून यामध्ये कॅमलिन, पितांबरी, अशोका बिल्डकॉन, चितळे डेअरी, चाणक्य मंडळ या व अनेक नामांकिंत कंपन्या सहभागी होणार आहेत समारोपाच्या सत्रामध्ये उद्योजक प्रसन्न पटवर्धन व अजित +मराठे यांच्या हस्ते प्रतिथयश उद्योजकांचा ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्काराने गौरव करण्यात येईल. परिषद यशस्वी होण्यासाठी मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे, राजेंद्र बेडेकर, मधुरा कुंभेजकर व निखिलेश सोमण आदी सदस्य प्रयत्नशील आहे.