केंद्रातील भाजप सरकारने ज्या प्रमाणे अपेक्षेनुसारच मतदारांना खूश करणारा अर्थसंकल्प मांडला असे अनेकांचे मत आहे. मात्र अपेक्षेनुसारच सर्व विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पण यात विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी टीका करणार हे अपेक्षित होते मात्र राज्य, केंद्रात भाजपसोबत सत्तेत बसलेल्या शिवसेनेने देखील सरकारला घरचा आहेर देत तोंडसुख घेतले आहे. ‘जनताभिमुख अर्थसंकल्पाचे नाटक पण प्रत्यक्षात राम मंदिराप्रमाणे विश्वासघातच’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी माध्यामातून दिली आहे. त्यामुळे सत्तेत राहूनदेखील भाजपला टोला लगावण्याचा आपला शिरस्ता शिवसेनेने सोडलेला नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा परत एकदा सत्तेत सोबत राहतील की नाही असा प्रश्न उभा राहिला आहे.