रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By
Last Modified: शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (09:35 IST)

या आहेत अर्थसंकल्पातील तुमच्या फायद्याच्या गोष्टी

शेतकरी, कामगार, नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना खूश करण्यासाठी मोदी सरकारनं अनेक घोषणा केल्या. त्यातील, आपले पैसे वाचवणारे काही महत्त्वाचे निर्णय आहेत. मोदी सरकारने निवडणुका पाहून अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामुळे सर्वाना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी इनकम टॅक्समध्ये सूट, टॅक्समध्ये घट, पेंशन, प्रोविडंट फंड आणि विमा यांची घोषणा केली. सरकारच्या या बजेटमुळे देशातील जवळपास 3 कोटी टॅक्स भरणाऱ्य़ा लोकांना याचा फायदा होणार आहे. भाजपला देखील आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा होणार आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली की, पाच लाखापर्यंत आता कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. जर यामध्ये गुंतवणूक धरली तर वर्षाला साडेसहा लाखावर सूट मिळणार आहे. फिक्स डिपॉझिटवर देखील सरकाने सूट दिली आहे. देशात फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 
 
पाच लाख र्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर नाही. ही मर्यादा अडीच लाख होती, ती थेट दुपटीने वाढवली.
>> ८० सी अंतर्गत १.५० लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास ५ लाख + १.५० लाख मिळून साडे सहा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त 
 
>> व्याजावरील करकपातीची मर्यादा १० हजारांवरून ४० हजारांवर. बँका-पोस्टातील ठेवींवरचं ४० हजार रुपयांपर्यंत व्याज करमुक्त.
 
>> स्टँडर्ड डीडक्शन ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांवर. 
 
>> रेंटल इन्कम (एचआरए) २,४०,००० रुपयांहून अधिक असेल तरच टीडीएस कापला जाणार. याआधी ही मर्यादा १,८०,००० रुपये होती. 
 
>> 'सेकंड होम'वर कर नाही तर २० लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युईटीवर कर नाही.
 
>> २१ हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना ७ हजार रुपये बोनस  
 
>>पीएम किसान योजनेअंतर्गत छोट्या शेतकऱ्यांच्या (2 हेक्टरी जमिनीचे मालक) खात्यात प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये
 
>> प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाः १५ हजार रुपयांहून कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देणार