रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (09:16 IST)

आमचे सरकार आल्यानंतर 'ही'चौकशी करू : जयंत पाटील

सध्याचे सरकार सर्व व्यवस्था गुंडाळण्याचे काम करीत आहे. इव्हीएम मशिन हॅक होतात. ते एका नेत्याला माहीत होते आणि त्यांचा अपघात होतो, हे हॅकर स्वत: सांगत आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अपघातात झाला की ती हत्या होती, याची चौकशी आमचे सरकार आल्यानंतर केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
 
कर्जत येथे आयोजित परिवर्तन मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. जनतेला फसविणारी टोळी दिल्ली आणि मुंबईत सरकार म्हणून बसली आहे. तिजोरीत पैसा नाही आणि घोषणांचा पाऊस आहे, अशा शब्दात पाटील यांनी सरकारवर टीका केली.