मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसनेचे निवडणुकीचे धनुष्य आता प्रशांत किशोर यांच्या हाती

shiv sena
शिवसनेने निवडणुकी आधी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार २०१४ साली भाजपने लोकसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या एकहाती विजयामध्ये प्रमुख आणि  महत्त्वाची भूमिका निभावणारे प्रशांत किशोर भाजपसोबत नाहीत. मात्र ते आता कुणासोबत आहेत? या प्रश्नाचं उत्तर शिवसेनेच्या मातोश्रीवर नुकत्याच झालेल्या खासदार बैठकीमध्ये सापडल्याचं बोलेले जाते आहे.

शिवसेनेच्या या महत्वाच्या  बैठकीमध्ये लोकसभेसाठी शिवसेनेने कशा पद्धतीने प्रचार करायला हवा? उमेदवार आणि पक्षांनी कोणत्या प्रकारे  कॅम्पेनिंग केले पाहिजे ? यावर चर्चा झाल्याचं पुढे येते आहे.  शिवसेनेचं कॅम्पेन कसं असावं? याचं प्रेझेन्टेशन खुद्द प्रशांत किशोर यांनीच दिल्याचं समोर येथे आहे. त्यामुळे आता भाजपचा विन-विन फॉर्म्युला शिवसेना राबवणार का? प्रशांत किशोर यांची ‘डिजिटल रणनीती’ शिवसेनेला स्वबळावर जिंकण्याचं सामर्थ्य देणार का? असे प्रश्नही त्या निमित्ताने उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

प्रशांत किशोर यांनी उत्तम प्रकारे भाजपचे निवडणूक प्रचार नियोजन केले होते, त्यांनी तर सोशल मिडीया इतक्या उत्तम रीत्या हाताळला होता की भाजपला त्याचा खूप मोठा फायदा झाला होता. तर नरेंद्र मोदी यांचे विचार त्यांनी जनतेसमोर ठेवले होते त्यामुळे भाजपचे विरोधक गारद झाले होते.