शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (16:31 IST)

३३,००० रुद्राक्षांनी साकारली शिवसेना प्रमुखांची प्रतिमा

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९३ व्या जयंती निमित्ताने मुंबईतील एका कलाकाराने ३३,००० रुद्राक्षांनी शिवसेना प्रमुखांची प्रतिमा साकारली आहे. चेतन राऊत असे त्या कलाकाराचे नाव असून ८ बाय ८ फूटाची ही प्रतिमा आहे. ही प्रतिमा शिवसेना भवनासमोर साकारली आहे.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे रुद्राक्षाशी विशेष नाते होते. यामुळे मी रुद्राक्षांनी त्यांची प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा बनवून आपण जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे, असे कलाकार चेतन राऊत यांनी सांगितले. चेतन राऊत जे. जे. स्कूल ऑफ आटर्सचा विद्यार्थी आहे. त्याने अनोख्या पद्धतीने शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा तयार केली आहे.

source : ANI