1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (17:09 IST)

दीपिका पादुकोणच्या 33 व्या मजल्यावर आग

Fire on the 33rd floor
मुंबईतल्या प्रभादेवीमधल्या ब्यूमाँड  या इमारतीमधल्या 33 व्या मजल्याला आग लागली आहे. या इमारतीमध्ये बडे उद्योगपती, कलाकार व अनेक सेलिब्रिटी या इमारतीत राहतात. याच इमारतीमध्ये 26व्या मजल्यावर दीपिका पादुकोणचाही फ्लॅट असल्याचं सांगण्यात आलं आहे. आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आल आहे. मात्र, अजूनही प्रचंड प्रमाणात धूराचं साम्राज्य या परीसरात पसरलं असून अग्निशमन दलाचे जवान त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीमध्ये 33 वा मजला भक्ष्यस्थानी पडल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच 32 व्या मजल्याचीही काही प्रमाणात हानी झाली आहे. प्रभादेवीतली ब्यूमाँड ही इमारत 10 ते 12 वर्ष जुनी आहे. इमारतीचे बाकीचे मजले रिकामे करण्यात आले असून किती व कसली हानी झाली या संदर्भात निश्चित माहिती समजलेली नाही. मुख्यत: फर्निचर व अन्य सामान जळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.