मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 12 जून 2018 (11:49 IST)

रामदेवबाबा यांना श्रीश्री रविशंकर टक्कर देणार

रामदेवबाबांच्या पतंजलीला आता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्रीश्री रविशंकर यांच्याकडून कडवी टक्कर मिळणार आहे. रविशंकर यांची एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी जाहिरातींवर जवळपास 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. आयुर्वेद आणि हर्बल क्षेत्रात मुसंडी मारण्यासाठी श्रीश्री यांच्या ब्रँडची देशभरात 1 हजार दुकाने उघडण्यात येणार आहेत. या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येणार आहे.
 
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेवेळी श्रीश्री यांच्या कंपनीनं जाहिरातींवर 10 कोटी रुपये खर्च केले होते. श्रीश्री तत्व नावाने दुकाने सुरू करणार्‍या श्रीश्री आयुर्वेद ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपिटिया यांनी आता कंपनी वेगाने विस्तार करण्यावर भर देणार आहे, अशी माहिती दिली.