रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पत्नीसोबतचा डीपी ठेवला नाही, केली पोलीसात तक्रार

उत्तर प्रदेशच्या साहिबाबादमध्ये पतीने पत्नीसोबतचा फोटो व्हॉट्सअॅपवर डीपी ठेवला नाही म्हणून एका पत्नीने थेट पोलिसात धाव घेत पती विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत पत्नीने पतीवर छळाचा आरोपही केला आहे. पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साधारण महिन्यापूर्वी या दाम्पत्याने त्यांचे काही कपल फोटो काढले होते. त्यापैकी एक फोटो हा पत्नीने पतीला डीपी म्हणून ठेवायला सांगितला होता. तसेच हा फोटो डीपी ठेवावा असा हट्टच तिने पतीजवळ केला होता. मात्र पतीला तो फोटो ठेवायचा नव्हता. त्यामुळेच सांगूनही फोटो न ठेवल्यामुळे वैतागलेल्या पत्नीने पोलिसात धाव घेत पती छळ करत असल्याची तक्रार दाखल केली होती.

मात्र पोलिसांनी केलेल्या समुपदेशनानंतर पतीने चूक मान्य केली. त्यामुळे आता पत्नीने पतीविरोधात केलेली तक्रार मागे घेतली आहे.