गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 25 मे 2018 (16:55 IST)

सर्व इलेक्‍ट्रिक वाहने 2050 पर्यंत शक्‍य

भारतात 2030 पर्यंत सर्व वाहने इलेक्‍ट्रिक करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मात्र ते 2050 पर्यंत शक्‍य होणार आहे. सरकारने हायब्रीड वाहनाचा पर्याय शिल्ल्क ठेवण्याची गरज असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने म्हटले आहे.
 
कार कंपन्यांना इलेक्‍ट्रिक वाहनाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याबरोबर यासाठी वीज निर्मिती आणि चार्जिंग पॉंईटसारखे काम सरकारला करावे लागणार आहे. त्यासाठीही मोठा कालावधी लागणार असल्याने कंपनीचे उपाध्यक्ष शेखर विश्‍वनाथन यांनी सांगितले. त्याबरोबर आगामी काळात इतर तंत्रज्ञानावर आधारित वाहने विकसित होण्याची शक्‍यता आहे. त्या शक्‍यताही खुल्या ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सरकारने जर हायब्रीड कराचा पर्याय खुला ठेवला तर तुलनेने परिस्थिती चांगली राहण्याची शक्‍यता आहे. त्या अवस्थेत सरकारला पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कमी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, कंपनीच्या वाहनांना मागणी चांगली आहे. या वर्षी आम्ही 1 लाख 60 हजार वाहनांच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे.