शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जून 2018 (14:46 IST)

भारतीय हवाई दलाचे जग्वार फायटर जेट क्रॅश

गुजरातच्या कच्छभागात सकाळी १०.३०च्या सुमारास बेराजा गावाबाहेर भारतीय हवाई दलाचे जग्वार फायटर जेट क्रॅश झाले. या अपघातात वैमानिक एअर कमांडर संजय चौहान यांचा मृत्यू झाला आहे.
 
गुजरातमधील जामनगर एअरबेसमधील जग्वार फायटर जेटने नियोजित सरावासाठी उड्डाण केले होते. हे विमान एअर कमांडर संजय चौहान चालवत होते. दरम्यान, बेराजा गावाबाहेर अचानक क्रॅश झाले. या अपघातात संजय चौहान यांचा मृत्यू झाला तसेच चरण्यासाठी आलेल्या पाच गाईंचादेखील मृत्यू झाला.
 
लेफ्टनंट कर्नल मनिष ओझा यांनी या क्रॅशबाबत माहिती दिली. ते म्हणाले ‘जामनगरच्या बेसवरून सरावासाठी जग्वार फायटर जेटने उड्डाण केले. १०.३० च्या दरम्यान हे विमान क्रॅश झाले. यात एअर कमांडर संजय चौहान यांचा मृत्यू झाला. या क्रॅशची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’हवाई दलाचे विमान क्रॅश होण्याची ही महिन्याभरातील दुसरी घटना आहे. महिन्याभरापूर्वी आसाममध्ये SW-80 हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. त्यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता.