शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (15:24 IST)

दहशतवाद्यांकडून पोलिसांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलाला लक्ष्य केलं आहे. शोपियान येथे बाटपोरा चौकात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. ग्रेनेड हल्यानंतर दहशतवाद्यांनी परिसरात अंदाधुंद गोळीबारही केला.त्यात एका मुलीचा मृत्यू झाला असून पाच नागरिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे. गेल्या चार दिवसात जम्मू-कश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी केलेला हा १४ वा हल्ला आहे.
 

रविवारी जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. त्याचवेळी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेते अब्दुस रशीद यांच्या घरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलं होत. त्यानंतर पुलवामा जिल्हयातील त्रालमध्ये दहशतवाद्यांनी ४२ राष्ट्रीय रायफल्सच्या लष्करी तळावर ग्रेनेड हल्ला केला.सुदैवाने यात कुठलीही हानि झाली नाही.