1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (12:52 IST)

दोन दहशतवादी ठार

terrorists

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. वासिम शाह आणि हाफिज निसार अशी या दहशतवाद्यांची नावे असून यातील वासिम हा लष्कर’चा कमांडर असल्याची माहिती समोर येत आहे.

पुलवामामधील लिटर गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. शनिवारी पहाटेपासून ही चकमक सुरु होती. अखेर सुरक्षा दलांना दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. सध्या परिसरात शोधमोहीम सुरु आहे. दोन्ही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.