1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. 2 militants killed, two terrorists killed in militant attack

दहशतवादी हल्ल्यांत २ जवान शहीद, २ दहशतवादी ठार

2 militants killed

जम्मू काश्मीरमध्ये एकाचवेळी चार ठिकाणी दहशतवादी घटना घडल्या आहेत. साम्बुरा, पुलवामा, अनंतनाग आणि कुपवाडामध्ये दहशतवादी घुसले असून काही ठिकाणी हल्लेदेखील झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये २ जवान शहीद झाले असून २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. 

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन जवानांना वीरमरण आले. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी कारवाईची दुसरी घटना अनंतनागमध्ये घडली. या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

श्रीनगरपासून १७ किलोमीटरवर असणाऱ्या पम्पोरमध्येही दहशतवादी घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे या भागात जवानांकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. याशिवाय कुपवाडामधील एसएसपी ऑफिसजवळ ग्रेनेड सापडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. 

पुढील लेख
ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट १० मिनिट झाले डिअॅक्टिव्ह