बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (11:44 IST)

स्त्री-पुरुष आर्थिक समानतेत भारताची घसरण

स्त्री-पुरुष आर्थिक समानतेत भारताची घसरण झाली असून १४४ देशांत तो १०८व्या स्थानावर आला आहे. गेल्या वर्षी तो ८७ क्रमांकावर होता.‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जारी केलेल्या जागतिक लैंगिक असमानता निर्देशांक २०१७ या अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे.  

या यादीत आइसलँड, नॉर्वे व फिनलँड या देशांचे स्थान अव्वल असून, ४७व्या क्रमांकावर असलेला बांगला देश दक्षिण आशियात सर्वात वरच्या स्थानावर आहे. या वर्गवारीत भारताची घसरण ही ‘आरोग्य आणि जीवनमान’ आणि ‘महिलांचा आर्थिक सहभाग आणि त्यांना उपलब्ध संधी’ या दोन निर्देशांकांमुळे झाली आहे. आरोग्याच्या बाबतीत स्त्री-पुरुष असमानतेत भारत १४१व्या स्थानावर म्हणजे शेवटून चौथा आहे. स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलाच्या जन्माचा आग्रह, यामुळे ही असमानता वाढत असल्याचे मत अहवालात आहे.