रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (10:17 IST)

‘नासा’ने शोधले पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने ब्रम्हांडात पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह असल्याचा शोध लावला आहे.  नासाच्या केपलर दुर्बिनीद्वारे या ग्रहांचा शोध घेण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे या 20 ग्रहावर एलियन्सचा अधिवास असू शकतो किंवा माणसाला तिथे राहण्याजोगी स्थिती आहे, असा शोध नासाने दुर्बिणीच्या साहाय्याने लावला आहे. याठिकाणी सध्या तिथे जीव आहेत किंवा तिथे जिवंत राहता येईल.

या ग्रहांमधील एक 7923.0 नावाचा ग्रह आहे जो पृथ्वी 2.0 म्हणून ओळखला जात आहे. या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यास 395 दिवस लागतात, त्यामुळे इथे पृथ्वीप्रमाणे 365 दिवसांचं नाही तर 395 दिवसांचं वर्ष असेल. हा ग्रह थोडा थंड आहे, हा पृथ्वीच्या आकाराच्या 97 टक्के आहे. या ग्रहावरील उष्णता म्हणजे आपल्याकडील थंडी आहे. मात्र त्याचा माणसावर काही खास फरक पडणार नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला.