बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गुरुवारी पृथ्वीजवळून जाणार लघुग्रह

बंगळुरु- येत्या गुरूवारी म्हणजे 12 ऑक्टोबरला पृथ्वीजवळून एक लघुग्रह जाणार आहे. येथील अंतराळ संशोधन केंद्रातील निवृत्त तज्ज्ञ रमेश कपूर यांनी याबाबतची माहिती दिली. 2012 टीसी-4 नावाचा हा लघुग्रह पृथ्वीच्या अतिशय जवळून जाईल, मात्र हे अंतर अर्थातच सुरक्षित असेल. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर 94 हजार 800 किलोमीटर इतके असेल.
 
हा लघुग्रह आपल्या अक्षाभोवती फिरत असतो आणि यापूर्वीही पृथ्वीच्या जवळून गेला आहे. आता त्याचे पृथ्वीपासूनचे कमाल अंतर 27 हजार किलोमीटर इतके आहे. हे अंतर चंद्रापासूनच्या अंतराच्या दोन-तृतीयांश इतके आहे. आपल्या ग्रहमालिकेत लघुग्रहाचाही एक पट्टा आहे. अनेक लघुग्रह आजपर्यंत पृथ्वीजवळून गेले आहेत. त्यापैकी क्वचितच एखाद्या लघुग्रहाची पृथ्वीला धडक झाली आहे. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवरून डायनासोरची प्रजाती नष्ट झाली होती, असे मानले जाते.