पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही गुजरातच्या दौर्यावर आले असता त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारावर शरसंधान केले आहे. गुजरातमध्ये विकासचे काय झाले? तो वेडा कसा झाला? असा सवाल करतानाच, थापा ऐकून ऐकून विकास वेडा झाला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या या फटकेबाजीला उपस्थितांनी टाळ्यांच्या...