शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोदींनी केले आदित्य ठाकरे, सचिन, अर्जुनचे कौतुक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. याशिवाय मोदींनी सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकरचंही कौतुक केलं.
 
आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी मंगळवारी सकाळी स्वत: झाडू हाती घेऊन मुंबईत स्वच्छता केली. मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलासह सहभाग घेतला. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या सर्वांनी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली.