शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

अर्जुनची निवड अंडर 19 मुंबई संघात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर- 19 संघात समावेश निवड झाली आहे. 17 वर्षी अर्जुन जे वायलेले इंडिया इन्व्हिटेशनल वनडे स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे. बडोद्यात 16 ते 23 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल.
 
यापूर्वी अर्जुन मुंबईच्या चौदा वर्षांखालील आणि 17 वर्षाखालील संघाकडून खेळला आहे. डावखुरा गोलंदाज अर्जुनने फेकलेल्या यॉर्करमुळे इंग्लंडचा फलंदाज जॉनी वेअरेस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे बेअरेस्टोला क्रिझ सोडून जावे लागले होते.
 
खरंतर लॉर्ड्सजवळच सचिन तेंडुलकरने एक घर घेतले आहे. त्यामुळे जलदगती गोलंदाज अर्जुनला इंग्लंड टीमसोबत सराव करण्याची संधी मिळते. इंग्लंडमधील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधीही अर्जुनने भारतीय संघासोबत नेटमध्ये सराव केली होती.