गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

ड्रेसवरून मिताली ट्रोल!

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज पुन्हा एकदा ट्रोलची शिकार ठरली आहे. मितालीने ट्विटरवर मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यावर बोल्ड अवतार असा शिक्का लावत मितालीला लक्ष्य करण्यात आले आहे.
 
दरम्यान, काही चाहत्यांनी मात्र मितालीच्या समर्थनार्थ जोरदार बॅटिंग केली आहे. मितालीच्या कपड्यांना काही ट्विपल्सकडून आक्षेप घेण्यात आला. हे फोटो तू डिलिट कर. लोक तुला आदर्श मानत असताना असला ड्रेसिंग सेन्स तुला शोभणारा नाही, असे एका ट्रोलरने नमूद केले. मिताली तुझ्याकडून तरी मला ही अपेक्षा नव्हती. तुझ्याबद्दल जो आदर मला वाटत होता तो आता संपला आहे, असे अन्य एका ट्रोलरने म्हटले आहे.