बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोदींना शत्रुघ्न सिन्हा यांचे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येत प्रसारमाध्यमांना सामोरे जाऊन प्रश्नांची खुलेपणाने उत्तरे देण्याची वेळ आली आहे, असे आव्हान भाजपाचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींना दिले आहे.  शत्रुघ्न सिन्हा म्हणाले," आपण मध्यमवर्गीय, निर्यातक, लहान व्यापारी, तसेच संपूर्ण देश विशेषकरून गुजरातमधील नागरिकांची चिंता करतो, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी दाखवले पाहिजे." यशवंत सिन्हा यांनी केलेल्या टिप्पणीला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शेलक्या शब्दात दिलेल्या उत्तरानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी हे वक्तव्य केले आहे.   
 
यशवंत सिन्हा यांच्यावर टीका करणाऱ्या अरुण जेटलींचा शत्रुघ्न सिन्हा यांनी परखड शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, "देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत यशवंत सिन्हा यांच्या निरीक्षणाचे मी आणि माझ्याप्रमाणे विचार असणारे अनेक नेते जोरदार समर्थन करतो. पक्ष आणि पक्षाबाहेरील लोकांनीही त्यांच्या विचारांचे समर्थन केले आहे. येत्या काही दिवसांत नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणार आहे." असे स्पष्ट केले आहे.