1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Only mother and son can become Congress chief, Aiyar

काँग्रेसमध्ये आई किंवा मुलगाच अध्यक्ष बनू शकतो

काँग्रेस पक्षात फक्त दोन व्यक्ती अध्यक्ष बनू शकतात. आई किंवा मुलगा. राहुल गांधी यांनी आधीच तशी तयारी दाखवली आहे अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी स्वपक्षातील घराणेशाहीवर हल्ला चढवला आहे.
 
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अय्यर यांनी ही तिरकस प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे राहुलच अध्यक्ष होणार या दाव्याची अय्यर यांनी खिल्ली उडवली आहे. कोणतीही निवडणूक होण्यासाठी किमान दोन व्यक्तींची गरज असते. पण निवडणूक लढविण्यासाठी तुमच्याकडे माणसेच नसतील. केवळ एकच उमेदवार असेल तर निवडणूक कोणत्या आधारावर घ्यायाची? असा सवाल त्यांनी केला.
पुढील लेख
गब्बरला आयसीसी चे नियम माहीत नव्हते!