गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 9 ऑक्टोबर 2017 (12:18 IST)

कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी फक्त आई किंवा मुलगाच - मणिशंकर अय्यर

कॉंग्रेस पक्षावर नेहमी घराणेशाहीचा आरोप विरोधक करत असतात, त्यात भर म्हणून कॉंग्रेसच्या जेष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या निवडीवर नाराजी दाखवत टीका केली आहे.अय्यर म्हणतात की काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी फक्त दोन व्यक्तींची निवड होऊ शकते, आई किंवा मुलगा. 

सोनिया गांधींकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच सांभाळणार आहेत या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अय्यर यांनी हे धक्कादायक विधान केले.