शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (10:13 IST)

'गोवा' महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित राज्य

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्ये महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत. ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.  देशभरातील राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र या यादीत नवव्या स्थानावर आहे. 

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा सर्वाधिक सुरक्षित असून बिहार सर्वाधिक असुरक्षित आहे. बिहारसोबतच झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्लीदेखील महिलांसाठी असुरक्षित असल्याचे आकडेवारी सांगते. तर गोव्याखालोखाल केरळ, मिझोरम, सिक्कीम, मणीपूर या राज्यांचा क्रमांक लागतो. प्लान इंडियाकडून तयार करण्यात आलेला अहवाल बुधवारी महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात महिला सुरक्षेसह शिक्षण, आरोग्य, गरिबी हे मुद्दे विचारात घेण्यात आले आहे.