बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (17:04 IST)

पॉर्न पाहण्यात भारतीय तिसऱ्या नंबरवर

भारतात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. स्वस्त स्मार्टफोन आणि मोफत डेटामुळे पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं समोर आलं आहे. पॉर्नहब वेबसाईटचे आकडे धक्कादायक आहेत. भारतात पॉर्न पाहण्याची सरासरी वेळ 8.22 मिनिट आहे, तर प्रतिदिन पॉर्न वेबसाईटला भेट देण्याची सरासरी वेळ 7.32 आहे.

बीबीसी हिंदीने अॅनालिटिक्स कंपनी ‘विडुली’च्या संस्थापक आणि सीईओ सुब्रत कौर यांच्याशी बातचीत करुन याबाबतचं वृत्त दिलं आहे. यावर्षी जानेवारीमध्ये एक रिपोर्ट समोर आला होता. अमृतसर, लखनौ, अलपुझा आणि त्रिचूर यांसारख्या शहरांमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित फाईल्स शेअर करण्याचं प्रमाण जास्त आहे, असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

निमशहरांमध्ये पोर्नोग्राफी सर्च करण्याचं आणि पाहण्याचं प्रमाण जास्त आहे. जानेवारी 2016 मधील एका रिपोर्टनुसार, पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीत अमेरिका आणि इंग्लंडनंतर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने कॅनडालाही मागे टाकलं आहे.