रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (16:17 IST)

कॉंग्रेस पाटीदार समाजाला आरक्षण कधी देणार - हार्दिक पटेल

भाजपा विरोधात गेल्यावर आता गुजरात येथील पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेस गुजरात निवडणुकीत जिंकली तर पाटीदार समाजाला कधी आणि किती दिवसात आरक्षण देणार आहेत असे ठणकावून विचारले आहे. तसे केले नाही तर अन्यथा अमित शाह यांचं सुरतमध्ये जसं झालं तसे हाल करू असा धमकी वजा इशारा दिला आहे.
 
हार्दिक यांनी ट्वीट केले आहे की "3/11/2017तक कोंग्रेस पाटीदार को संवैधानिक आरक्षण कैसे देंगी,उस मुद्दे पर अपना स्टेण्ड क्लीयर कर दे नहीं तो अमित शाह जैसा मामला सूरत में होगा"
गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरात दौरा करणार आहेत. त्यामध्ये पहिली घोषणा ते पाटीदार आंदोलन कधी करणार यावर देतील असा कयास लावला जात आहे.अमित शाह यांची याआधी सुरतमध्ये सभा झाली, त्यावेळी पाटीदार समाजाच्या लोकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे राहुल यांच्या सभेत सुद्धा गोंधळ होऊ शकतो असे चित्र आहे. गुजराथ येथे जवळपास १५ टक्के हा समाज असून विधासभेतील ८० जागांवर या सामाचे मोठा प्रभाव आहे.