रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (11:11 IST)

आधारकार्ड बँकेतही बनवून मिळणार

येत्या नोव्हेंबर महिन्यापासून आधार कार्ड बँकेतही बनवून मिळणार आहेत. तसंच यापूर्वी बनवण्यात आलेल्या आधार कार्डांमध्ये काही चुका असतील तर त्या त्रुटीही बँकांमध्ये सुधारल्या जातील. 

ही सुविधा प्रत्येक बँकेच्या दहा शाखांपैंकी एका शाखेत उपलब्ध असेल. या शाखांमध्ये मशीन लावण्यात येणार आहेत तसंच कर्मचारीही नियुक्त करण्यात येतील. याबाबत बँकेच्या शाखांना यासाठी तयारी करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. 

बँक खात्यांना आधार लिंक करण्यात होणारा उशीर टाळण्यासाठी ही व्यवस्था केली जातेय. त्यामुळे आधार लिंकचं काम लवकर होऊ शकेल. यासाठी एसीबीआय, पीएनबी समवेत सर्व प्रमुख बँकांच्या दहा शाखांपैंकी एका शाखेला निवडलं जाईल.