गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (11:32 IST)

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

sonia gandhi

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आलं आहे. पोटाच्या विकारामुळे सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोनिया गांधी यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली उपतार सुरु करण्यात आले आहेत. गेल्यावर्षीही वाराणसीमध्ये एका रोड-शो दरम्यान सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर ३ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचं एक ऑपरेशन करण्यात आलं होतं.