1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (12:40 IST)

'माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी पंतप्रधान पदासाठी अधिक योग्य'

sonia gandhi
‘2004 साली सोनिया गांधींनी माझी पंतप्रधानपदी निवड केली. पण माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी हे त्या पदासाठी अधिक योग्य होते.’ असं वक्तव्य मनमोहन सिंह यांनी केल आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द कोलिशन इयर्स 1996-2012’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.

 या कार्यक्रमात बोलताना मनमोहन सिंह म्हणाले की, ‘मी राजकारणात अपघातानं आलो होतो. पण प्रणव मुखर्जी हे अगदी ठरवून राजकारणात आले होते. 2004 साली जेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान म्हणून माझी निवड केली त्यावेळी मला माहित होतं की, प्रणव मुखर्जी हे त्या पदासाठी अधिक योग्य आहेत. पण त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यावेळी जर प्रणब मुखर्जी यांनाही असंच वाटत असेल तर त्यात काहीही गैर नाही ' असे त्यांनी सांगितले.