सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

काँग्रेसला धक्का: नारायण राणे यांचा राजीनामा

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण यांनी अखेर आज पार्टीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा पार्टी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवला आहे. राणे यांनी काँग्रेस सोडताना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. विधानपरिषदेच्या सभापतींकडे माझा राजीनामा सोपवण्यात आला आहे, असे राणे यांनी सांगितले.
 
राणेंचा राजीनाम काँग्रेससाठी मोठा धक्काच म्हणावं लागेल. पार्टीने आपला वापर करून घेतला, असा आरोप राणे यांनी केला आहे. राज्यातील अनेक नेते पक्ष सोडणार असून 25 नगरसेवक आताच माझ्यासोबत काँग्रेसचा राजीनामा देत आहेत आणि लवकरच आम्ही भविष्यातील वाटचाल काय असणार हे स्पष्ट करू, असे राणे म्हणाले.
 
राणे अलीकडे राज्यात झालेल्या राहुल गांधी यांच्या दौर्‍यांमध्येही सामील झाले नव्हते. आता ते शुक्रवारपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. नागपूर येथून त्यांच्या दौर्‍याची सुरुवात होणार आहे.