1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन

मराठा आरक्षण
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या 5 सदस्यीय उपसमितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत शिवसेना नेते दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे.
 
राज्यभरात मराठा समाजाने अनेक भव्य मोर्चे काढून आरक्षणाची मागणी केली आहे. मुंबईतील मोर्चावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा केली होती. मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी ही समिती संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे.