शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लवकरच प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी

मुंबई- संपूर्ण राज्यामध्ये गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. या संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
 
प्लॅस्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, या बाबत अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच महिला बचतगटांनाही अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी त्यांना सबसिडी दिली जाईल. 
 
टप्प्याटप्याने राज्यातील महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही प्लॅस्टिकवर बंदी घालण्याबाबत सांगण्यात येणार आहे. 
 
मुंबईत अलिकडे झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक भागात प्रचंड पाणी साचले होते. जागोजागी फेकलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, हे प्रमुख कारण समोर आले आहे.