शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (13:20 IST)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन...

मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमुळे या महामार्गाची चाळण होऊन मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतरही या महामार्गाची दुरुस्ती होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे व युवा नेते अनिकेत तटकरे  यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रोहा शहरात मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टाऊन हॉल येथून निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यावरुन प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.